Skip to content

संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान कधी?


आषाढी वारी २०२५– महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक परंपरांपैकी एक असलेल्या आषाढी वारीचे 2025 चे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले आहे. यंदा संत तुकाराम महाराज यांची पालखी 18 जून रोजी देहूतून प्रस्थान करणार असून, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 19 जून रोजी आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. लाखो वारकरी “विठ्ठल विठ्ठल”चा गजर करत चालत पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत.

Advertisement

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2025 वेळापत्रक

दिनांक प्रवास / मुक्काम विशेष कार्यक्रम
१९ जून आळंदी – प्रस्थान पालखी सोहळ्याचा प्रारंभ
२० जून आळंदी ते पुणे
२१ जून पुणे मुक्काम
२२ जून पुणे ते सासवड
२३ जून सासवड मुक्काम
२४ जून सासवड ते जेजुरी
२५ जून जेजुरी ते वाल्हे
२६ जून वाल्हे ते लोणंद माऊलींचे निरास्मान
२७ जून लोणंद ते तरडगाव
२८ जून तरडगाव ते फलटण
२९ जून फलटण ते बरड
३० जून बरड ते नातेपुते बरड येथे गोल रिंगण
१ जुलै नातेपुते ते माळशिरस सदाशिवनगर येथे गोल रिंगण
२ जुलै माळशिरस ते वेळापूर खुडूस येथे गोल रिंगण
३ जुलै वेळापूर ते भंडी शेगाव ठाकूर बुवा समाधी गोल रिंगण व बंधूभेट
४ जुलै भंडी शेगाव ते वाखरी बाजीराव विहीर येथे उभे रिंगण
५ जुलै वाखरी ते पंढरपूर वाखरी येथे गोल रिंगण
६ जुलै पंढरपूर मुक्काम देवशयनी आषाढी एकादशी, चंद्रभागा स्नान
१० जुलै पंढरपूर ते आळंदी (परतीचा प्रवास सुरू)

टीप: वारी मार्गात बदल किंवा स्थानिक परंपरांनुसार कार्यक्रमात फेरबदल होऊ शकतात. अधिकृत माहिती आणि अपडेटसाठी स्थानिक पालखी समितीच्या सूचना तपासाव्यात.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 2025 वेळापत्रक

दिनांक प्रवास / मुक्काम विशेष उल्लेख
१८ जून देहू – प्रस्थान, इनामदार वाडा मुक्काम प्रारंभिक सोहळा
१९ जून देहू – निगडी – आकुर्डी, आकुर्डी मुक्काम
२० जून आकुर्डी – पुणे, नाना पेठ मुक्काम
२१ जून पुणे, निवडुंगा विठ्ठल मंदिर मुक्काम
२२ जून पुणे – हडपसर – लोणी काळभोर मुक्काम
२३ जून लोणी काळभोर – यवत मुक्काम
२४ जून यवत – वरवंड – चौफुला मुक्काम
२५ जून वरवंड – उंडवडी गवळ्याची मुक्काम
२६ जून उंडवडी गवळ्याची – बारामती मुक्काम
२७ जून बारामती – काटेवाडी – सणसर पालखीतळ मुक्काम काटेवाडी येथे मेंढी-बकरी रिंगण
२८ जून सणसर – बेलवाडी – निमगाव केतकी मुक्काम बेलवाडी येथे पहिलं गोल रिंगण
२९ जून निमगाव केतकी – इंदापूर मुक्काम इंदापूर येथे गोल रिंगण
३० जून इंदापूर – सराटी पालखीतळ मुक्काम
१ जुलै सराटी – अकलूज मुक्काम अकलूज येथे निरास्मान व गोल रिंगण
२ जुलै अकलूज – बोरगाव मुक्काम माळीनगर येथे उभं रिंगण
३ जुलै बोरगाव – पिराची कुरोली मुक्काम
४ जुलै पिराची कुरोली – वाखरी पालखीतळ मुक्काम बाजीराव विहीर येथे उभं रिंगण
५ जुलै वाखरी – पंढरपूर मुक्काम वाखरी येथे उभं रिंगण
६ जुलै पंढरपूर – एकादशी नगरप्रदक्षिणा व चंद्रभागा स्नान
१० जुलै परतीचा प्रवास – पंढरपूर ते देहू

टीप: पालखी मार्ग व वेळा स्थानिक परिस्थितीनुसार बदल होऊ शकतात. अधिकृत घोषणेसाठी स्थानिक पालखी समितीच्या सूचनांकडे लक्ष द्या.

Advertisement

आषाढी वारी: महाराष्ट्राच्या श्रद्धेचा जीवंत उत्सव

वारकरी संप्रदायाची वारी ही केवळ यात्रा नाही, तर भक्ती, सामूहिक एकात्मता आणि सांस्कृतिक वारशाचा एक जिवंत अनुभव आहे. “विठ्ठल विठ्ठल” च्या गजरात होणारी ही वारी प्रत्येक वर्षी महाराष्ट्राच्या हृदयातून पंढरपूरच्या दिशेने निघते. रिंगण, भजन, दिंडी, अभंग आणि आषाढी एकादशीला चंद्रभागा स्नान – या सर्व गोष्टी वारकऱ्यांच्या भक्तीला आणखी उंचीवर नेतात.

आषाढी वारी 2025 ची महत्त्वाची दिनांक

दिनांक कार्यक्रम
18 जून संत तुकाराम महाराज पालखीचे देहूतून प्रस्थान
19 जून संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आलंदीहून प्रस्थान
6 जुलै आषाढी एकादशी – चंद्रभागा स्नान आणि श्री विठ्ठल दर्शन
10 जुलै दोन्ही पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू

आषाढी वारी 2025 मध्ये लाखो भक्त सहभागी होणार असून, ही यात्रा पुन्हा एकदा भक्तीचा जागर बनणार आहे. यंदाची आषाढी एकादशी 6 जुलै 2025 रोजी आहे, त्यामुळे त्या दिवशी पंढरपूरमध्ये अत्यंत मोठी गर्दी अपेक्षित आहे. पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी आणि चंद्रभागा स्नानासाठी वारकरी मोठ्या उत्साहात येतात.

Advertisement


Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version