Skip to content

मराठी भाषेची कैफियत मराठी निबंध | Marathi Bhashechi Kaifiyat Essay In Marathi Best 100


या पोस्ट मध्ये मराठी भाषेची कैफियत मराठी निबंध लेखन / marathi bhashechi kaifiyat Essay In Marathi 100 ते 400 शब्दात निबंध लेखन करणार आहोत 

Advertisement

Marathi Bhashechi Kaifiyat Essay In Marathi

निबंध लेखन – मराठी भाषेची कैफियत

[मुद्दे : मराठी भाषा भाषणातून मनोगत व्यक्त करीत आहे, असा प्रसंग मराठीचा अवमान करणारा प्रसंग दु:ख व संताप – मराठीला कमी लेखणे – सर्व व्यवहार इंग्रजीत – मराठी हद्दपार होत जाणे – मराठीचा विकास नाही – विकासासाठी जीवनाच्या सर्व क्षेत्रांत मराठीचा वापर आवश्यक]

“माझ्या मराठी भाषक लेकरांनो,
तुम्हांला माझे प्रेमपूर्वक आशीर्वाद.

Advertisement

मी मराठी भाषा. तुमची मातृभाषा. म्हणजे आईच. तरीही, तुम्हांला ‘प्रेमपूर्वक आशीर्वाद’ म्हणू की तुम्ही आता परकेच बनला आहात म्हणून ‘स. न. वि. वि.’ असे त्रयस्थासारखे म्हणू? की घरातल्या म्हाताऱ्या माणसाला अडगळीच्या खोलीत ढकलून दयावे, तसेच तुम्ही मला केले आहे, म्हणून तुम्हांला कोपरापासूनच दोन्ही हात जोडून नमस्कार करू? काय करू?

मला काही कळेनासे झाले आहे. मन उद्विग्न झाले आहे. निराशेने ग्रासलेले आहे. त्या दिवसाच्या घटनेने तर दुःखाचा कडेलोट झाला. संतापाचा स्फोट झाला. कारण एका शाळेत मराठी बोलल्याबद्दल शिक्षकांनी मुलांना छडीने मारले.

Advertisement

एक-दोन नव्हे, तर तब्बल अठ्ठावीस मुलांना मारले! अंगावर वळ उठेपर्यंत! ही एखादी कपोलकल्पित किंवा खूप खूप प्राचीन काळातील घटना नव्हे. ही घटना आहे अगदी कालपरवाची. बुधवार दिनांक ९ जुलै २०१४ रोजीची. पुणे या विदयेच्या माहेरघरातली!

अरे, काय चाललेय हे? काय करताय? कुठे चालला आहात? याचे काय परिणाम होणार आहेत आणि पुढे काय भोगावे लागणार आहे, हे ठाऊक आहे का तुम्हांला? तुमचे माझ्यावरचे प्रेम कमी कमी होत चालले आहे. इतकेच नव्हे, तर तुम्हांला आता माझी लाज वाटू लागली आहे.

Advertisement

शाळेतल्या मुलाला जशी स्वत:च्या अशिक्षित आईला शाळेत न्यायला लाज वाटते, तशी तुम्हांला माझी लाज वाटते. तुम्हांला इंग्रजीत बोलता येणे गौरवास्पद वाटते. मराठीत बोलणे मागासलेपणाचे वाटते. दरवाजावर नावाची पाटी लावायची झाली, तरी तुम्ही ती इंग्रजीतच लावता. सहीसुद्धा इंग्रजीत करता.

तुम्ही व्यवहार मराठीत करीत नाही. शास्त्राची व शासनाची भाषा मराठी राहिलेली नाही. मराठीचा वापरच होत नसेल, तर तिचा विकास होणार कसा? संगणकात वाटेल त्या भाषेतून काम होऊ शकत असताना, तेथे तुम्ही इंग्रजीतच कामे करता. साहजिकच जिथे जिथे संगणक वापरतात, तिथे तिथे मराठी हद्दपार होत आहे.

Advertisement

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आता संगणक स्थिर झालेला असल्याने, जवळ जवळ सर्वच क्षेत्रांतून मराठी हुसकावली जात आहे. कोणी मराठीचा आग्रह धरलाच, तर मराठी विकसित नाही, असा आक्षेप घेता. म्हणजे तुम्ही वापर करीत नाही म्हणून विकास नाही आणि विकास नाही म्हणून मराठीचा वापर नाही, असे हे दुष्टचक्र बनले आहे. सगळेजण इंग्रजी माध्यमाच्या शाळांसमोर रांगा लावताहेत.

मराठी शाळा ओस पडताहेत. मग मी जगणार कशी? ही परिस्थिती किती भीषण आहे, हे कोणाच्या लक्षातच येत नाही. सध्या टीव्हीवर एक जाहिरात दाखवली जाते. त्या जाहिरातीतील शाळकरी मुलगी आपला खेळात विजय व्हावा, अशी देवाला विनंती करताना दाखवली आहे.

Advertisement

ते दृश्य कसे आहे? ती मुलगी गुडघ्यांवर पलंगाच्या बाजूला पलंगावर कोपर टेकवून उभी आहे. ही युरोपियन पद्धत झाली. एका मराठी घरातील मुलगी देवाचा धावा युरोपियन पद्धतीने करते! हे सांस्कृतिक आक्रमण होय. कळत नकळत हे आक्रमण चारी चालू आहे. भाषेसोबत संस्कृतीही नष्ट होत आहे.

फार थोडी माणसे इंग्रजीवर प्रभुत्व मिळवू शकतील. सामान्य मराठी माणसे मात्र इंग्रजीवर प्रभुत्व मिळवूच शकणार नाहीत. त्यामुळे त्यांना स्वत:च्या घरात कायमचे दुय्यम नागरिकत्व भोगावे लागणार आहे. परिस्थिती हाताबाहेर गेलेलीच आहे. पण माझ्या लेकरांनो, माझा समूळ नाश व्हायच्या आत काहीतरी उपाय केला पाहिजे.

Advertisement

माझा विकास करायचा असेल, तर मराठीतून शिक्षण घेतले पाहिजे. मराठीतून लेखन-वाचन केले पाहिजे. मराठी ग्रंथ विकत घेऊन वाचले पाहिजेत. सर्व क्षेत्रांतील लोकांनी आपले ज्ञानविचार मराठीतून प्रकट केले पाहिजेत.

मराठी ज्ञानभाषा बनली पाहिजे; परंतु मराठीचा विकास होण्यासाठी मराठी माणसाचा विकास झाला पाहिजे. मराठी माणसाने विकासासाठी धडपडले पाहिजे, तरच मी म्हणजे मराठी भाषा जिवंत राहील.

Advertisement

आम्हाला आशा आहे की मराठी भाषेची कैफियत मराठी निबंध लेखन / Essay On Marathi Bhashechi Kaifiyat In Marathi निबंध लेखन कसे वाटले ते कमेन्ट मध्ये नक्की कळवा धन्यवाद,


Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *