Skip to content

आजचा संसारी माणूस मराठी निबंध


या पोस्ट मध्ये आपण आजचा संसारी माणूस मराठी निबंध / Aajcha Sansari Manus Essay In Marathi100 ते 400 शब्दातनिबंध लेखन 100 ते 400 शब्दांमध्ये करणार आहोत

Advertisement

Aajcha Sansari Manus Essay In Marathi

( मुद्दे : घरात चिंताक्रांत वातावरण – सगळ्यांना हताश करणाऱ्या विवंचना – गरीब संसारी माणसाच्या विवंचना न संपणाऱ्या – मुलेसुद्धा उत्पन्नाचे मार्ग शोधतात – मुलांच्या शिक्षणात भविष्य बदलण्याची आशा – संपूर्ण वस्ती विवंचनाग्रस्त )

मी ढकलगाडीवरून हंडा-कळशी भरून पाणी आणले आणि घरात शिरले; तर आईबाबा चिंताक्रांत दिसले. आई तर हताश होऊन एकटीच बडबडत बसली होती. माझे बाबा माथाडी कामगार आहेत. काल त्यांना कामच मिळाले नव्हते. काम नाही मिळाले की ते उद्विग्न होतात.

Advertisement

सारखा हिशेब मांडत राहतात. पगार किती कमी मिळेल? कोणता खर्च करता येणार नाही? हे त्यांचे सारखे चालू असते. आज ते थोडेसे खुशीत होते. आज काम मिळेल, अशी त्यांना खात्री होती. शिवाय, संध्याकाळी शेठजींच्या घरी सामानाची हलवाहलव करायची होती. त्याचेही पैसे मिळणार होते.

पण इकडे आईची चिंता वेगळीच होती. थंडीचे दिवस. आजीला थंड पाण्याची अंघोळ सोसणार नव्हती. तिला गरम पाणी देणे आवश्यक होते. पण त्यामुळे गॅस संपण्याची भीती होती. अनुदानातले सिलिंडर संपले होते. आता जास्त पैसे देऊन सिलिंडर घ्यावा लागणार होता.

Advertisement

पुढच्याच महिन्यात आजीचा साठावा वाढदिवस होता. तिला साडी घ्यायची बाबांची इच्छा होती. पण ते शक्यच नव्हते. आई पॅकिंगच्या कारखान्यात कामाला जाते. तिचा बसचा पास संपला होता. आमच्या घरातली रोजची सकाळ अशी काळ्या ढगांनी काळवंडून जाते.

आईबाबांचा तुटपुंजा पगार एकाही महिन्यात तो पुरा पडत नाही. आम्ही दोन भावंडे, आईबाबा आणि आजी असे पाच माणसांचे आमचे कुटुंब. अपुऱ्या पगारामुळे आम्ही सर्वजणच नेहमी त्रस्त असतो. तुम्हांला सांगते, कधी कधी गॅस घ्यायला पैसे नसले की आम्ही घरी फक्त वडापाव खाऊन राहतो.
२०१५ साल उजाडले आहे. नवी शहरे वसवली जात आहेत.

Advertisement

पण आम्हा गरीब संसारी माणसांच्या जीवनात अजूनही सुखाचे कवडसे येत नाहीत. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजा आहेत, असे आम्हांला कॉलेजात शिकवतात. अन्नसुरक्षा कायदा झाला आहे. पण अगदी साधे जेवण आम्ही आमच्या घरात समाधानाने जेवलो, असा दिवस आठवत नाही.

माझा दादा रोज सकाळी घरोघरी पेपर टाकण्याचे काम करतो. त्यामुळे त्याच्या कॉलेजच्या खर्चाला हातभार लागतो. मी आणि आजी कपड्यांना टिकल्या लावणे, बटणे शिवणे, मणी ओवून माळा करणे असली कामे करतो. वर्तमानपत्रांपासून कागदी पिशव्या बनवूनही आम्ही दुकानांमध्ये विकतो.

Advertisement

दिवाळीत आम्ही आकाशकंदील करून विकतो. हा मात्र आमच्या आनंदाचा काळ असतो. संक्रांतीला पतंग करून विकले, तर थोडेफार पैसे मिळतात. तुमचा विश्वास बसणार नाही, तरीही सांगते, ही अशी वरकड कामे करून आम्ही हप्त्याने टीव्ही घेतला आहे!

दरवर्षी परीक्षेनंतर निकाल लागतो आणि आम्ही दोन्ही भावंडे पास होतो, तो दिवस म्हणजे आमच्या घरातला दिवाळी-दसरा असतो. आमच्या या निकालात आईबाबांना सुखाची स्वप्ने दिसतात. “चांगले शिका, खूप शिका,” असे ते आम्हांला सतत सांगत असतात. ते एवढेच करू शकतात. पैसे खर्च न करता देता येण्यासारखी त्यांच्याजवळ हीच एक गोष्ट आहे.

Advertisement

खरे सांगायचे तर या शब्दांतून ते आम्हांला ‘सुखी व्हा’ असा जणू आशीर्वादच देत असतात. आमच्या वस्तीत एकूण तीस कुटुंबे आहेत. सर्वांची आयुष्ये विवंचनांनी भरलेली आहेत. सदोदित त्रासलेली; ताणाच्या भाराखाली असलेली. संध्याकाळी एकत्र आली की हास्यविनोद करून मन रमवण्याचा प्रयत्न करतात. पण कधी कधी साध्या साध्या कारणानेही हमरीतुमरीवर येतात. सुख त्यांना सदोदित हुलकावण्या देत फिरत असते. सुखाने मांडलेला लपंडाव म्हणजे संसारी माणसाचे जीवन होय !

वरील निबंध खालील विषयांवर देखील लिहू शकता

  • आजचा संसारी माणूस मराठी निबंध / Aajcha Sansari Manus Marathi Nibandh
  • संसारी माणूस निबंध लेखन मराठी / Sansari Manus Essay In Marathi
  • माणसाचा संसार निबंध इन मराठी / Mansancha Sansar Essay In Marathi

आम्हाला आशा आहे की आजचा संसारी माणूस मराठी निबंध / Essay On Aajcha Sansari Manus Essay In Marathi हे निबंध लेखन नक्कीच आवडले असेल, धन्यवाद..

Advertisement


Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version